आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या आदेशाने पोलिस दलातर्फे ठिकठिकाणी पथसंचलन करण्यात येत आहे.त्यानुषंगाने नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यातील खांडबारा,शहादा तालुक्यातील म्हसावद पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.यात अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने शहरातील व गावातील प्रमुख रस्त्याने मार्गक्रमण केले.
नंदुरबार शहरातूनही पथसंचलन
सकाळी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी त्या अनुषंगाने उपनगर पोस्टे हद्दीतील विविध मार्गांवर पोलिस संचलन करण्यात आले.
नंदुरबार येथील उपनगर पोलिस ठाण्यातर्फे पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी ११ जून रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसाठी उपनगर पोस्टे हद्दीत चित्तेनगर, अहिंसा चौक, संभाजीनगर, काका का ढाबा, गिरीविहार गेट, बाबा गरीबदास, सी.बी. पेट्रोल असा रूटमार्च घेण्यात आला. सदर रूटमार्चमध्ये सपोनि-१, पोसई-२, पो.अं.-२७, शहर पोस्टे-१अधिकारी, ५ अंमलदार सहभागी झाले होते.
खांडबारात बाजारपेठेतून मार्गक्रमण
खांडबारा शहरात मागील काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या पार्श्वभूमीवर खांडबारा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने खांडबारा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवरून विसरवाडी पोलिसांच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नितीन पाटील यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पथसंचलनास खांडबारा पोलिस दूरक्षेत्रपासून सुरुवात केली. एकवीरा ऑटो पार्ट्स, मेन रोड, महाराणा प्रताप चौक, सिंधी गली, मशीद गली, शिवाजी चौक, चौधरी गल्ली, व खांडबारा पोलिस दूरक्षेत्र येथे सांगता झाली.
म्हसावद येथेही काढला रुटमार्च
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाचे गावात पथसंचलन करण्यात आले. म्हसावद पोलिस स्टेशनतर्फे गावात पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत म्हसावद पोलिस व शहादा आर.सी.पी.व होमगार्ड यांचे पथसंचलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे यांच्यासह पोलिस कर्मचारी म्हसावद गावातील मुख्य बाजारपेठ, अहिल्याबाई चौक, कुबेर मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, हायस्कूल परिसर, तोरणमाळ फाटा आदी ठिकाणाहून गर्दी असलेल्या ठिकाणी पथसंचलन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.