आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:रेल्वे पेन्शनर असो.तर्फे ज्येष्ठ सभासदांचा सन्मान

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अखिल भारतीय रेल्वे पेन्शनर असोसिएशनतर्फे पेन्शनर दिनानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या सभासदांचा भारतीय स्टेट बँकेच्या सभागृहात स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक राजेशकुमार मिश्रा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महामंत्री अध्यक्ष वाय.के. पाठक, बँकेचे संजय धामणकर, स्वामिनाथ शुक्ला आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात वयाची पंचाहत्तरी गाठणाऱ्या एकनाथ चौधरी, भिकाभाई वसावे, वाय.डी. माळी, इंदास चित्ते, गोपाळ पाटील, रामचंद्र परदेशी, सुपडू पाटील, लक्ष्मी कुलकर्णी, लीलाबाई निकुंभे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बँकेत वयोवृद्ध पेन्शनरांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी, बँकेत पेन्शन घेण्यास असमर्थ असणाऱ्या सभासदांना मेडिकल प्रमाणपत्रानुसार त्यांच्या वारसाकडे पेन्शन मिळण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...