आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:सिलिंडर दरवाढीविरोधात‎ रायुकाँचे निषेध आंदोलन‎‎

नंदुरबार19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईमुळे त्रस्त लोकांच्या‎ त्रासात आणखी भर पडली आहे.‎ बुधवारपासून घरगुती सिलिंडरच्या‎ किंमतीत ५० रुपयांची दरवाढ‎ झाली आहे. तर व्यावसायिक‎ सिलिंडरच्या किंमतीत ३५०‎ रुपयांनी वाढ झाली आहे.‎ ईशान्येकडील तीन राज्यात‎ विधानसभा निवडणूक झाल्यानंतर‎ लगेच किंमती वाढवल्या आहेत.‎ या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी‎ युवक काँग्रेसतर्फे येथील सुभाष‎ चौकात निषेध आंदोलन केले.‎ दरवेळी नवनवीन गाजर देत‎ सर्वसामान्य जनता व‎ व्यावसायिकांचे कंबरडे मोडणारे‎ भाजपचे केंद्र सरकार फक्त देश‎ विक्रीकडे नेत असल्याचा भावना‎ कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

‎राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष‎ डॉ. अभिजीत मोरे यांच्या‎ आदेशाने तसेच राष्ट्रवादी युवक‎ काँग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे,‎ जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा‎ यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध‎ आंदोलन करण्यात आले. या वेळी‎ राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मोहन‎ रायभान माळी, माजी शहराध्यक्ष‎ नितीन जगताप, राष्ट्रवादी ओबीसी‎ सेल जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी,‎ ओबीसी सेल समन्वयक नीलेश‎ चौधरी, राष्ट्रवादी युवक‎ शहराध्यक्ष लल्ला मराठे,‎ व्हीजीएनटी सेलचे जिल्हा‎ उपाध्यक्ष मिलिंद जाधव, राजा‎ ठाकरे, सुनील राजपूत, विद्यार्थी‎ आघाडी शहराध्यक्ष जयंत मोरे,‎ युवक कार्याध्यक्ष कालू पहेलवान,‎ उपाध्यक्ष लाला बागवान, अमोल‎ पाडवी, राजू शिंदे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...