आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामफळाची आवक:तळोदा येथील बाजारामध्ये‎ रामफळ विक्रीसाठी दाखल‎

तळोदा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्याची चाहुल लागली असून‎ शहरातील बाजारपेठेत सातपुड्यातील‎ रानमेवा म्हणून परिचित असणारे लाल व‎ पिवळसर रंगाचे व चवीला गोड असलेल्या‎ रामफळाची सध्या बाजारात विक्रीसाठी‎ दाखल झाली आहेत. सीताफळाचा हंगाम‎ संपत आल्यानंतर या फळाची बाजारात‎ आवक सुरू होते.‎ तालुक्यातील ग्रामीण भागात शेत शिवारात‎ रामफळाची झाडे अजूनही उत्पन्न देत‎ असल्याने शिल्लक असून बाजारात सध्या‎ रामफळ प्रति किलो ७० ते ८० रुपये या दराने‎ विक्री होत आहे. सीताफळाप्रमाणे या फळांच‎ तुलनेत या वृक्षांचे प्रमाण अत्यल्प आहे.‎

रामफळाचे झाड हे सदाहरित या प्रकारात‎ मोडते. त्याची उंची साधारणपणे २६ ते ३०‎ फूट एवढी असते. या फळांद्वारे शरीराला‎ ‘सी’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाण मिळते.‎ तसेच कॅल्शियम, मॅगनीज, फॉस्फरस व‎ पोटॅशियम ही पोषक द्रव्येही मिळतात.‎ सीताफळ हंगाम संपल्यानंतर जानेवारीच्या‎ दुसऱ्या पंधरवड्यापासून रामफळाची आवक‎ बाजारात सुरू होते. हा हंगाम मार्च‎ अखेरपर्यंत चालतो.‎

बातम्या आणखी आहेत...