आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथनाट्य सादर:रासेयोच्या पथनाट्य, रॅलीद्वारे पर्यावरण जागृती, दवाखाना परिसर केला स्वच्छ

खेडदिगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालय व कृषी महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत गुरुवारी पर्यावरण जनजागृतीसाठी लोणखेडा चार रस्ता येथे पर्यावरण संरक्षण या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.

पथनाट्याद्वारे वृक्षलागवड, प्रदूषणाचे दुष्परिणाम, पाणी बचत, स्वच्छतेची गरज, प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम इ. संदेश देण्यात आला. तसेच रॅलीद्वारे लोणखेडा चार रस्ता ते ग्रामपंचायत परिसरापर्यंत वसुंधरा संरक्षण आणि स्वच्छताविषयक जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना पुरुषोत्तमनगर येथे स्वच्छता अभियान राबवले. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव कमल पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांनी अभिनंदन केले. जनजागृती विषयक उपक्रमांचे नियोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पंकज पेंढारकर, प्रा.राजेंद्र पाटील, डॉ.वजीह अशहर, डॉ.वर्षा चौधरी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...