आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील म्हसावद, मंदाणे ग्रामीण भागात, शहादा शहराला लागून असलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. गत वर्षात रस्त्यांच्या दुरवस्थेने अनेक युवकांना प्राण गमवावे लागले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसतर्फे म्हसावदजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आठवडाभरात काम सुरू न झाल्यास तालुकाभरात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा शहादा तालुका काँग्रेसतर्फे देण्यात आला. शहादा-तोरणमाळ रस्त्यावर म्हसावद गावालगत तोरणमाळ चौफुली येथे सोमवारी दुपारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी नंदुरबार जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, नंदुरबार जिल्हा किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष गणेशराजे पाटील, अनिल कुवर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश निकम, दिलीप पावरा, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. योगेश पावरा, प्रकाश पावरा,पंचायत समिती सदस्य गुपसिंग पटले, मिलिंद अहिरे, सरपंच विठ्ठल ठाकरे, उपसरपंच नर्मद्या पावरा,सरपंच विजयसिंग वाघ, सरपंच प्रल्हाद पवार, सरपंच विनोद ठाकरे, उपसरपंच कृष्णा जाधव, सचिन बेदमुथा, जितेंद्र पवार, उपसरपंच वसंत ठाकरे, पंचायत समिती माजी सभापती किशोर पाटील, गोविंद भिलावे, डॉ. जाधव ठाकरे, कल्पेश वाघ, निलसिंग पवार, पंचायत समिती सदस्य सत्यन वळवी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर म्हसावद पोलिस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या उपस्थित बंदोबस्त तैनात केला होता.
दोन तास वाहतूक ठप्प
शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश नाईक यांचा नेतृत्वाखाली नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट घालणार घेराव
शहादा तालुक्यातील ग्रामीण रस्ते, हायवे, जि.प.चे रस्ते व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेल्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर अवजड वाहन, दुचाकी मोटार सायकल चालवणे अवघड झाले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झालेली आहे. संबंधित रस्त्यांची त्वरित संबंधित विभागाने दुरुस्ती न केल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व कार्यालयाला घेराव घालणार.- सुभाष पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, काँग्रेस
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.