आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामला समाजाने काय दिले, यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो या भावनेने युवकांनी समाजाची सेवा करावी. समाजाकडे बघताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. समाजातील सर्व जाती-धर्मातील लोकांना आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करण्याचे संस्कार राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांतून केले जातात. या शिबिरांतून स्वतःमध्ये अपेक्षित बदल घडवून स्वावलंबी, सहयोगी व समाजाेपयोगी बना, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि येथील जिजामाता शिक्षण संस्थेचे जिजामाता शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोदा येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘राष्ट्रीय समाज सेवा'' विभागाच्या फलकाचे अनावरण डॉ.नांद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान राजेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच सुरेश महिरे, गुलाब नाईक, ग्रामसेवक अविनाश गावित, रासेयोचे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ.मनिष करंजे, डॉ.संजय शिंगाने, नंदुरबार समन्वयक डॉ.विशाल करपे अादी मान्यवर उपस्थित हाेते.
युवकांच्या गुणांना मिळताेय वाव
विद्यापीठांतर्गत साहस, उत्कर्ष, प्रेरणा, आव्हान व विशेष श्रमसंस्कार शिबिरे राबवली जातात. उमलते व्यक्तिमत्व, झेप गरुडाची व ध्यास सूर्याचा असणाऱ्या युवकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन देश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी या शिबिरांमधून मिळते, असे डॉ.शिंगाणे यांनी उद्घाटन प्रसंगी मनाेगतातून सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.