आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:जिल्ह्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या शपथविधीचे स्वागत

नंदुरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. या निमित्ताने भारतीय जनता पक्ष नंदुरबार शहराच्या वतीने जुनी नगरपालिका चौकात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आदिवासी नृत्य पथक, ढोल-ताशांच्या गजरात राष्ट्रपती मुर्मू यांचा फोटो, हातात भाजपचे झेंडे, फटाक्यांची आतिषबाजी, एकमेकांना पेढे भरवीत साजरा करण्यात आला. या वेळी आनंद उत्सव साजरा करताना भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संगीताताई सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश गवळे, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हाचिटणीस पायल मोदाणी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज जैन, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष बी. डी. पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस प्रशांत पाटील, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप पाटील, अल्पसंख्याक शहराध्यक्ष समीर मन्सुरी, महिला जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम उपस्थित होते.

शहादा शहर भाजपसह आदिवासी मोर्चातर्फे आनंदोत्सव केला साजरा देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने शहादा शहर भाजप व भाजप आदिवासी मोर्चातर्फे आनंद साजरा करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. याव्यतिरिक्त शहरातून छोटेखानी मिरवणूक काढली. या जल्लोषात भाजप जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाळे, शहर अध्यक्ष विनोद जैन, उपाध्यक्ष पंकज सोनार, राजीव देसाई, आदिवासी जिल्हा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, महिला आघाडीच्या नंदा सोनवणे, रोहिणी भावसार, गोपाल गांगुर्डे, कार्तिक नाईक, कमलेश जांगिड, प्रदीप ठाकरे, प्रमोद सोनार, जायंट्स ग्रुप अध्यक्ष सतीश जवेरीसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला महामहीम म्हणून विराजमान होत असल्याने हा सुवर्णयोग आहे. हा आदिवासींचा गौरव व सन्मान आहे. देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे, असे भाजप आदिवासी जिल्हा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे यांनी बोलताना सांगितले. याव्यतिरिक्त मकरंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...