आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:अपात्र ठरवलेल्या वन दाव्यांबाबत पुनर्विचार, कमी जमीन मिळालेल्यांबाबत हाेणार सुनावणी

नंदुरबार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन दाव्यांबाबत प्रशासन सकारात्मक आहे. या संदर्भातील प्रश्नांवर चर्चेअंती सुनावणी घेण्याचे, पुनर्विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी चर्चेवेळी दिल्याने लाेकसंघर्ष माेर्चाच्या वतीने सुरू करण्यात आलेले धरणे आंदाेलन मागे घेण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यात धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील महिला व पुरुष सहभागी झाले. माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी हेही उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधी मंडळासोबत बैठक घेत सर्व मागण्यांवर चर्चा केली. या बैठकीत गटविकास अधिकारी, तहसीलदार व वन विभाग अधिकारी उपस्थित होते.

ओल्या दुष्काळासंदर्भात ज्यांचे नुकसान झाले असेल त्यांना काही मदत देता येईल का यासाठी प्रयत्न करू. ज्या फाईल गहाळ अथवा खराब झाल्या त्याबाबत प्रशासन स्वतः त्यांची सुनावणी घेईल. ज्या वन दावेदारांना पात्र करताना त्यांना प्रत्यक्षात मागणीपेक्षा कमी जमीन मंजूर केली त्यांच्या उर्वरित जमिनीबाबत पुन्हा सुनावणी करण्यात येईल. अपात्र दाव्यंाबाबत पुनर्विचार हाेेणार आहे.

अन्यथा पुन्हा आंदाेलन करणार : प्रतिभा शिंदे
जर या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा मोठ्या संख्येने आम्ही सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा प्रतिभा शिंदे यांनी दिला. आंदाेलनासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...