आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:भगवंताचे नियमित नामस्मरण केल्यास जीवन होते फलदायी

शहादा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या सानिध्यात राहिल्यास जीवनाचे कल्याण होते. भगवंतांची नियमित नामस्मरण केल्यास जीवनफलदायी होते, असे प्रतिपादन संत लोकेशानंद महाराज यांनी केले.लोणखेडा तालुका शहादा येथे कृषी महाविद्यालयाजवळ आयोजित केलेल्या श्री नारायणपूरम मंदिराच्या आवारात अमृत भक्तिमोत्सवात दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सत्संग प्रसंगी संत लोकेशानंदजी महाराज बोलत होते.

संत आणि परमेश्वराची भक्ती याबाबत ते सत्संग करीत होते. अक्षरशः उपस्थित भाविक त्यांच्या सत्संगात तल्लीन झाले होते. महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर पर्यंत अमृत भक्ती महोत्सव सुरू आहे. पुढे बोलताना संत लोकेशननंद महाराज यांनी संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत गोरा कुंभार, अशा अनेक संतांनी पावन झालेली महाराष्ट्राची भूमी आहे. परमेश्वराला भजन व कीर्तन प्रिय आहे. त्यांचे रोज नामस्मरण करा असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...