आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेलनेस एज्युकेशन इनोग्रेशनच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून वर्ल्ड डिजिटल डेटॉक्स डे सेलिब्रेशन ही चळवळ राबवली जात असून मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही स्क्रीनच्या अतिवापरामुळे परिवार निराशावादी बनत चालले आहे. मुले मोबाइल पाहूनच जेवण करतात. हे मानसिक, बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या घातक असल्याने नंदुरबारच्या रेखा चौधरी यांनी सुरू केलेल्या या चळवळीला जगभरातील ५५ देशांनी सहभाग नोंदवला आहे.
नंदुरबारच्या हिरा प्रतिष्ठान, पी.के. अण्णा पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात देशातील शालेय स्तरावरील पहिला जनजागृतीपर कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला. यानंतर ही जनजागृतीची माेहीम प्रत्येक शाळांस्तरावर राबवली जाणार आहे. मोबाइल, फेसबुक, लॅपटॉप, टीव्ही यांनी आपले जीवन व्यापून टाकले आहे.
ही समस्या आता जागतिकस्तरावर डोकेदुखी ठरू लागली आहे. यासाठी डिजिटल डेटॅाक्स ही चळवळ सुरू केली असून भारतात नंदुरबारच्या रेखा चौधरी यांनी सुरू केलेली ही चळवळ आता जागतिक पातळीवर पोहाेचली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी, माजी नगरसेविका अनिता चौधरी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रेखा चौधरी यांनी या चळवळीची माहिती दिली.
मोबाइलच्या सवयी टाळा
रेखा चौधरी म्हणाल्या, थोडा वेळ स्वत:साठी द्या. रात्री झोपताना मोबाइल बंद ठेवा किंवा जवळ ठेवू नका, परिवारांनी जेवताना सर्व मोबाइल डब्यात ठेवा, आठवड्यातून एकदा निसर्गाच्या सान्निध्यात जा. लहान मुलांना मोबाइल दाखवून खाऊ घालू नका. मोबाइल दाखवून भोजन देणे हे विषसमान आहे. गावासह शहरात ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोबाइल, गुगलच्या आहारी गेल्याने काही आत्महत्येच्या पातळीवर पोहोचत आहेत, असे त्या म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.