आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा‎:गोवर संशयितांची संख्या‎ धुळ्यात घटल्याने दिलासा‎

धुळे‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पूर्वीच्या तुलनेत आता गोवर संशयित‎ रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ही स्थिती असली‎ तरी दक्षतेचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य‎ विभागातर्फे सर्वेक्षण केले जाते आहे. शहरात‎ नोव्हेंबर महिन्यापासून गोवरचे रुग्ण आढळण्यास‎ सुरुवात झाली होती. त्यानुसार आत्तापर्यंत ६६ गोवर‎ बाधित तर ३६१ संशयित रुग्ण आढळले आहे.‎

बाधित व संशयितांवर उपचार सुरू आहे. गोवरच्या‎ साथीला अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या‎ आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण केले जाते आहे.‎ शहरात लसीकरण मोहिम वेगात सुरू झाल्याने‎ नवीन संशयित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले‎ आहे. पूर्वी दिवसाला ६ ते ७ संशयित रुग्ण आढळत‎ होते. आता केवळ १ ते २ रुग्ण आढळतात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...