आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सोशल मीडियावर धार्मिक‎ तेढ; चौघांविरोधात गुन्हा‎

नंदुरबार‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन धर्मियांत तेढ निर्माण होईल, अशा‎ पध्दतीने स्टेटस ठेवणाऱ्या चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल‎ करण्यात आले आहेत.‎ नंदुरबार शहरात एकाची हत्या‎ झाल्यानंतर या हत्येच्या व आरोपीच्या‎ बाजूने समर्थनार्थ स्टेटसवर पोस्ट‎ टाकण्यात आल्यानंतर पोलिसांनी‎ तत्काळ चौघांवर कारवाई करीत या‎ सर्वांना ताब्यात घेतले. ५ फेब्रुवारी रोजी‎ सकाळी ११.३० च्या सुमारास पोना‎ देविदास देवराज यांनी पोलिस ठाण्यात‎ दिनेश देविदास भोपे, जितेश राजू‎ श्रीखंडे या दोघांच्या विरोधात फिर्याद‎ दिली.

गुरुकुलनगर व गाेंधळी गल्लीत‎ राहणाऱ्या या दोघांनी भावनेच्या भरात‎ स्टेटसवर संदेश लिहिला. यापैकी‎ जितेश श्रीखंडे याने तर न्यू शक्ती‎ जयभारत ग्रुपवर दोन धर्मियांत तेढ‎ निर्माण होईल असा संदेश पोस्ट केला.‎ या प्रकरणाचा तपास पोसई प्रवीण‎ पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.‎ तसेच शहर पोलिस ठाण्यात सुनील‎ मोरे यांनी फिर्याद दिल्याने पवन माळी‎ व सागर लोहार याच्या मोबाइल‎ स्टेटसवर संदेश लिहिला. यामुळे या‎ दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.‎ पोसई सागर आहेर तपास करीत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...