आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎:खासगी चित्रीकरण स्थळांची‎ माहिती पाठवण्याचे आवाहन‎

नंदुरबार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिह्यासह राज्यातील खासगी मालकीच्या‎ चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त‎ निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित‎ चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी‎ गुगल ड्राइव्हवर स्थळांची विस्तृत माहिती,‎ छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक‎ पाठवण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी‎ आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने‎ (चित्रनगरी/फिल्मसिटी ) केले आहे.‎ महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले‎ राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे‎ चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात.‎

सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी‎ चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही‎ चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना‎ माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत‎ आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा‎ मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून‎ आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती‎ कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धी‎ माध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मिती‎ संस्थांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. याद्वारे‎ नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल .‎ अधिक माहितीसाठी संकेतस्थळांवर भेट देता‎ येईल. गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर‎ उपलब्ध आहे.‎

बातम्या आणखी आहेत...