आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन‎:ताबा, वहिवाटीबाबत आपसांतील‎ वाद सलाेखा याेजनेद्वारे मिटवा‎

नंदुरबार‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताबा व वहिवाटीबाबत‎ शेतकऱ्यांमधील आपापसांतील‎ वाद मिटवण्यासाठी व‎ समाजामध्ये सलोखा निर्माण‎ होऊन एकमेकांमधील सौख्य,‎ सौहार्द वाढीस लागण्यासाठी‎ सलोखा योजना सुरू करण्यात‎ आली असून जिल्ह्यातील‎ शेतकरी बांधवांनी या योजनेचा‎ लाभ घ्यावा, असे आवाहन‎ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी‎ केले आहे.‎ एका शेतकऱ्याच्या नावावरील‎ शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या‎ शेतकऱ्याकडे व दुसऱ्या‎ शेतकऱ्याच्या नावावरील‎ शेतजमिनीचा ताबा पहिल्या‎ शेतकऱ्यांकडे १२ वर्षांपासून‎ असणाऱ्या शेतजमीन धारकांच्या‎ अदलाबदल दस्तांसाठी शासनाने‎ ‘सलोखा’ योजना सुरू केली‎ आहे.

त्यासाठी केवळ एक हजार‎ मुद्रांक शुल्क व नोंदणी फी‎ आकारण्यात येणार असल्याची‎ माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी‎ पत्रकाद्वारे दिली आहे.‎ सलोखा योजनेचा कालावधी‎ अदलाबदल दस्तासाठी नोंदणी‎ फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत‎ देण्याबाबतची अधिसूचना शासन‎ राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या‎ दिनांकापासून दोन वर्षांपर्यंत‎ राहील. पहिल्या शेतकऱ्याच्या‎ शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या‎ शेतकऱ्याकडे व दुसऱ्या‎ शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा‎ पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२‎ वर्षापासून असला पाहिजे.‎

योजनेमुळे शेतकऱ्यांचे हे होणार फायदे‎ शेतजमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमीन‎ धारकांच्या जमीन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील.‎ शेतजमिनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर,‎ शेततळे, पाईपलाईन, वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या‎ विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आपापसातील‎ वादामुळे अनेक शेतजमिनी यापुढे पडीक राहणार नाहीत.‎

बातम्या आणखी आहेत...