आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्र तपासणी:म्हसावद येथे शिबिरास प्रतिसाद; 519 जणांची केली नेत्र तपासणी

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील म्हसावद येथे कै. कलावती पाडवी फाउंडेशनतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिर व चष्मा वाटपचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात एकूण ५१९ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.

नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित शिवाय कै. कलावती पाडवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी कलावती फाउंडेशनचे पदाधिकारी प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात एकूण ५१९ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१९ जणांना मोफत चष्मे वाटप केले. विशेष म्हणजे महिलांची संख्या अधिक होती.

सर्वांची नेत्रतपासणी धुळे येथील डॉ. ज्ञानेश्वर सोलंकी यांनी केले. शिबिरातील उपस्थित नागरिकांना डॉक्टर ज्ञानेश्वर सोळंकी यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आमदार राजेश पाडवी यांनी मनोगत व्यक्त करीत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...