आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या न्याय विभागाकडून दिशा उपक्रमांतर्गत विधी साक्षरता व जागरुकता कार्यक्रमांसाठी राज्य ग्रामीण विभाग संस्था, यशदा पुणे यांच्याकडून विधी दूत प्रकल्पासाठी जिल्ह्यातील निवडक ५० ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी ५ व्यक्तींना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण कोळदा कृषी विज्ञान केंद्र येथे देण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचे सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष, बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव व समुदाय संसाधन व्यक्तींना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येईल.
८ व ९ फेब्रुवारी या कालावधीत तळोदा तालुक्यातील बोरद, प्रतापपूर, मोड, तळवे, बुधावल, अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर, खापर, अलीविहीर, भाबलपूर, राजमोही, धडगाव तालुक्यातील सिसा, असली, खडक्या, खर्डा, राजबर्डी, नवापूर तालुक्यातील सागळी, निंबाणी, कारेघाट, वाटवी, खोकसा, लहान कडवान, विसरवाडी, केळी, बोकडझर, बिलदा, तिलासर येथील ग्रा,पं.चे प्रशिक्षण हाेईल.
तर १० व ११ फेब्रुवारी या कालावधीत नंदुरबार तालुक्यातील न्याहली, पावला, वेळावद, ठाणेपाडा, लोय, शनिमांडळ, वडझाकण, खोंडामळी, रनाळे, दहिंदुले बुद्रूक, भोलर व वाघाळे तर शहादा तालुक्यातील खेडदिगर, डोंगरगाव, कलसाडी, लोणखेडा, पुरुषोत्तम नगर, बामखेडा त.त, मंदाणा, वडाळी, कळंबू, गणोर, वडछिल, म्हसावद या ग्रा.पं.चे प्रशिक्षण हाेईल. प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रति दिवस १०० रुपये प्रवास भत्ता, चहा व नास्ता, भोजन देण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या व्यक्तींनी सकाळी ९ वाजता कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे उपस्थित रहावयाचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.