आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:रस्त्याचे काम सुरू; आंदोलन स्थगित

शहादा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा ते शिरपूर रस्त्यावरील अनरद बारी ते तोरखेडा फाटा दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, सुमारे ७ कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर दिनांक २२ ते ३० नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्या कार्यालयात विशेष बैठक झाली. उपविभागीय अभियंता एस. एम. जगताप, पी.जे. वळवी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष पमन पाटील, उपाध्यक्ष वसंत पाटील, सरचिटणीस रवींद्र पाटील, शहादा तालुका अध्यक्ष गणेश पाटील, सरचिटणीस योगेश पाटील, युवा अध्यक्ष रत्नदीप पाटील आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

तीन ठेकेदारांना दिले काम
संबंधित रस्ता हा राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला असला तरी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्राधिकरणामार्फत विभागाला ना हरकत दाखला प्राप्त झाला आहे. त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. -महेश पाटील, कार्यकारी अभियंता,साबांवि

बातम्या आणखी आहेत...