आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:महिन्याभरापासून जळालेले रोहित्र नादुरुस्तच; नवीन रोहित्र बसवा, संतप्त शेतकऱ्यांची मागणी

नवापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बिलबारा ३३ /११ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या धायटा परिसरातील ट्रान्सफॉर्मर (डीपी) महिन्यापूर्वी जळाला आहे. त्याजागी नवीन रोहित्र बसवण्यात यावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली.

महिनाभरापासून ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नवापूर तालुक्यातील बिलबारा, दुधवे, कोकणीपाडा, वासदा, जामदा, अंजने डोकारे, देवळीपाडा, बंधारे येथील हजारो शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. एक दिवसाआड वीज असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दहा ते बारा वेळेस वीज ट्रीप होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली. तोंडाशी आलेला घास वीज अभावी हिरवला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

चार ते पाच दिवसांत नवीन ट्रान्स्फाॅर्मर येणार
बिलबरा उपकेंद्रातील पावर ट्रांसफार्मरमध्ये बिघाड आला आहे. नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी औरंगाबाद येथे मागणी केली आहे. सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. चार ते पाच दिवसांत बिलबारा उपकेंद्रात पावर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येईल.
रामनवगेश्वर गौरकार, अभियंता

विजेचा लपंडाव, पाण्याचा प्रश्न गंभीर
बिलबारा गावासह शेजारील अनेक खेड्यापाड्यात शेतकऱ्यांची पिक करपली आहेत. विजेचा लपंडाव सुरू असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न नागरिकांसह गुरांना उद्भवत आहे. या अनुषंगाने वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याने तात्काळ उपाय योजना करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
सुदाम वळवी, सरपंच बिलबारा

बातम्या आणखी आहेत...