आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद वार्ता:अतिदुर्गम भागात रोषमाळ खुर्दला 24 वर्षांनंतर पोहोचली लालपरी; नर्मदा नदीकाठावरील 19 गावांसह पर्यटकांना दिलासा

अक्कलकुवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिदुर्गम भाग समजल्या हुंडा रोषमाळ खुर्द येथे २४ वर्षांनंतर अखेर पुन्हा अक्कलकुवा आगाराद्वारे बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. या बस सेवेमुळे परिसरातील ग्रामस्थांना तसेच नर्मदा पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. २४ वर्षांपूर्वी या गावासाठी शहादा आगारातून बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र नंतर बससेवा बंद करुन ग्रामस्थांची गैरसोय केली होती. तेव्हापासून धडगाव, अक्कलकुवा येथे येण्यासाठी ग्रामस्थांना मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी जादा भाडे देऊन जीवघेणा प्रवास करावा लागत होता. आता मात्र अक्कलकुवा आगाराची बससेवा सुरू झाल्याने वर्षानुवर्षे ‘लालपरी’ची असलेली प्रतीक्षा संपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या बस सेवेच्या शुभारंभ वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य संगीता पावरा, माजी जि.प. सदस्य हारसिंग मल्या पावरा, वडनेरे, बाजीराव वसावे, वाहतूक नियंत्रक दौलत पाडवी, चालक के.पी. पाटील, वाहक जयसिंग तडवी तसेच रोषमाळ खुर्द येथील नर्मदा परिसर विकास बहुउद्देशीय संस्थेचे बलसिंग पावरा, पोलिस पाटील विजय पावरा, लालसिंग पावरा, बाबूलाल बारदू पावरा, शामसिंग पावरा, नाना पावरा, जयवंत पावरा, रवींद्र पावरा, सुकलाल पावरा, मोहन शामसिंग पावरा, संतोष पावरा, जयसिंग पावरा, अनिल पावरा, मोहन बलसिंग पावरा, छोटूलाल पावरा, लक्ष्मण पावरा, आपसिंग पावरा, पंडित पावरा, नीलेश पावरा, कैलास पावरा, विलास पावरा, किसन पावरा, गोपाल पावरा, उमराणी, गोवित वसावे, हुंडा यांच्यासह रोषमाळ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...