आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रोटरी क्लबला सात पुरस्कारांनी गौरवले; क्लबने रोटरी वर्षात राबवले तब्बल 234 उपक्रम

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब नंदनगरी क्लबने सन २०२१-२२ या रोटरी वर्षात आतापर्यंत २३४ उपक्रम राबवले. या उपक्रमांच्या माध्यमातून क्लबने सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. क्लबच्या या कार्याची दखल घेत क्लबच्या पदाधिकाऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

रोटरी क्लब नंदनगरी क्लबने सन २०२१-२२ या रोटरी वर्षात आतापर्यंत २३४ उपक्रम (प्रोजेक्ट) राबवले. त्यांची दखल घेत रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० अंतर्गत सुरत येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव अनिल शर्मा व शब्बीर मेमन यांना सन्मानित करण्यात आले.

क्लबला डिस्ट्रीक्ट सायटेशन, पेट सेट, रोटरी डे चेअर सर्व्हिस प्रोजेक्ट, ग्रेट प्रेझेंटेशन असे एकूण सात पुरस्कार देवून क्लबला गौरवण्यात आले. या पुरस्कारांमध्ये रोटरीचे बीओडी व मेजर डोनर विशाल चौधरी, नीलेश तवर, जितेंद्र सोनार, इसरार सय्यद, नरेश नानकाणी, मदनलाल जैन, शीतल पटेल, प्रीतेश बांगड, रमाकांत पाटील, फखरोद्दीन बोहरी व सर्व सदस्यांचा सहभाग व सर्वांचा हा सन्मान असल्याचे क्लब अध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान या पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढली असून या पुढे यासह आणखी नवनवे उपक्रम समाजातील विविध घटकांसाठी राबवण्याचा निर्धार क्लब सदस्यांमध्ये व्यक्त झाला.

विविध घटकांसाठी योगदान
ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गरोदर महिलांना प्रोटीन, आयर्नच्या गोळ्या, वैद्यकीय तपासणी, गरजू विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शैक्षणिक साहित्याचे वाटप, संगणक कक्ष, डिजिटल वर्ग स्थापन, गरजू, अनाथ व्यक्तींना पादत्राणे, अल्पदरात डायलिसिस सेंटरचा लाभ, ५०० पेक्षा जास्त वृक्षलागवड असे काम झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...