आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम‎:नंदुरबारात कडाक्याच्या थंडीत रोटरी‎ क्लब नंदनगरीने दिली मायेची ऊब‎

नंदुरबार‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे‎ गरजू व्यक्तींना रात्रीच्या वेळी‎ शहरातील विविध भागात जाऊन‎ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.‎ जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला‎ आहे. अशा थंडीत शहरात व‎ परिसरात अनेकांना थंडी पासून‎ बचाव करण्यासाठी पुरेसे पांघरूण‎ नसते हि बाब लक्षात घेता रोटरी‎ क्लब ऑफ नंदनगरीतर्फे जैन‎ सोशल ग्रुपच्या सहकार्याने रात्रीच्या‎ वेळी शहरातील गांधी पुतळा, रेल्वे‎ स्टेशन परिसर, बस स्थानक परिसर‎ व सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात‎ उघड्यावर असणार्‍या, पांघरून‎ नसणाऱ्या गरजू व्यक्तींना शोधून‎ ब्लँकेट वाटप करण्याचा उपक्रम‎ राबविण्यात आला.

या उपक्रमात‎ रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव‎ किरण दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन‎ आकाश बेदमुथा, माजी अध्यक्ष‎ प्रितीश बांगड, लिटरसी चेअरमन‎ सय्यद इसरार अली, प्रा.डॉ.राहुल‎ मेघे, फक्रुद्दीन जलगूनवाला, मुर्तूजा‎ वोरा आदि सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...