आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ६ कोटी ६७ लाख ८७ हजार ९५४ रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या इमारतीच्या प्रकल्पांतर्गत सदर प्रकल्प खर्चाचा ९० टक्के हिस्सा राज्य शासन व १० टक्के हिस्सा नगरपालिकेचा असणार आहे. या निधीसाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
नंदुरबार पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. या पालिका प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी योजनेंंतर्गत १५ कोटी १९ लाख ८६ हजार ६१६ रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार शासन हिस्स्याची ६ कोटी ६७ लाख ८७ हजार ९५४ रुपये इतक्या निधीला शासनाच्या नगर विकास विभागाने ४ मे रोजी मंजुरी देऊन शासन निर्णय जारी केला. काही अटी, शर्तीच्या अधीन राहून हा निधी मंजूर केला आहे. प्रकल्पांतर्गत होणारी कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावी. नागरिकांच्या सोयी सुविधांमध्ये भर पडणार असल्याची खात्री करावी, यासह काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.