आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील तापी नदीवर सुमारे चारशे कोटी रुपये खर्चून बॅरेज उभारला आहे; परंतु त्याला गंज लागल्यामुळे त्याचे आयुष्यमान घटत आहे. तर बॅरेजचा दरवाजांची दुरुस्तीही होत नसल्याने दरवाजांना गळती लागली आहे. त्यामुळे पाणीसाठाही कमी होत आहे. त्यामुळे रंगरंगोटी होऊन योग्य ती देखभाल, दुरुस्ती होणे आवश्यक आहे. सारंगखेडा येथील तापी नदीवर सिंचनासाठी २००८ला सारंगखेडा बॅरेजचा प्रकल्प उभारण्यात आला.
यात पावसाळ्यानंतर ११ मीटर पाणी साठा अडवण्यात येतो. हिवाळ्यात मोठया प्रमाणात पाणीसाठा असतो. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी उपसा सिंचन दुरुस्तीसाठी ११५ कोटी मंजूर केले आहेत. त्यात २२ उपसा सिंचन योजना पुनःकार्यान्वित केल्यास १४ हजार ४१३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होऊन ५९ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. मात्र प्रकल्पास्थळी सुविधांचा मोठा अभाव आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून निधीअभावी या प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे.
दरवाजांना गळती
बॅरेजचा दरवाजांची दुरुस्ती होत नसल्याने गेल्या पाच, सहा वर्षांपासून दरवाजांना गळती लागली आहे. त्यामुळे साठा करण्यात आलेले पाणी वाया जात आहे. उन्हाळ्यात या प्रकल्पाचा पाणीसाठा कमी होत असल्याने पूर्वेस भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवते. प्रकल्पाचा लोखंडी दरवाजे पाण्यात असल्याने गंज चढून दरवाजांचे खालचे भाग विघटू लागले आहे. त्यामुळे दरवाजांचे आयुष्यमान घटत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे धूळखात
प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पाच वर्षांपूर्वी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे धूळखात पडले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.