आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:नायलॉन धागा विक्री;‎ 5 जणांवर गुन्हे दाखल‎

नंदुरबार‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायलॉन मांजा वापरास व विक्री‎ करण्यास बंदी असतांना विक्री‎ करणाऱ्या पाच पतंग विक्रेत्यांवर‎ जिल्हाभरात कारवाई करण्यात‎ आली असून तळोदा, शहादा,‎ उपनगर, नंदुरबार शहर पोलिस‎ ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले‎ आहेत. पोलिसांनी पतंग विक्रेत्यांना‎ नोटीसा बजावूनही पतंग विक्रेते नफा‎ कमावण्याच्या उद्देशाने नायलॉन‎ मांजा विक्री करत असल्याचे पुन्हा‎ पुन्हा समोर येत आहे.‎ तळोदा शहरात ५ जानेवारी रोजी‎ दुपारी १२ वाजेच्या सुमारास‎ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे‎ पोलिस हवालदार सुनील पाडवी‎ यांनी अल्ताफ अजित अन्सारी‎ याच्या दुकानातून तीन हजार रूपये‎ किमतीचे सहा नायलॉन धागे जप्त‎ करण्यात आले. तसेच त्याच्या‎ विरोधात फिर्याद दाखल केली.‎ नंदुरबार तालुक्यातील धानोरा‎ गावात इलेक्ट्रिक दुकानासमोर ५‎ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या‎ सुमारास पोलिस नाइक अविनाश‎ चव्हाण यांच्या तक्रारीवरून किरण‎ सुदाम चौधरी याच्या विरोधात १‎ हजार ४० रूपयांचा नायलॉन धागा‎ विक्री केल्याने गुन्हा दाखल केला‎ आहे.

तसेच नंदुरबार शहरात अमर‎ टॉकीज जवळ एका हनुमान‎ मंदिराच्या शेजारी प्रभाकर वामनराव‎ पवार याच्या दुकानातून २ हजार ५००‎ रूपयांचा धागा जप्त करण्यात‎ आला असून अभय राजपूत यांनी‎ गुन्हा दाखल केला आहे.याच पतंग‎ विक्रेत्याने आम्ही नायलॉन धागा‎ विक्री करीत नाही,अशी खोटी‎ माहिती पत्रकारांना दिली होती.‎ शहादा येथे गणेश नगर परिसरात‎ पोशि विजय ढिवरे यांनी योगेश‎ शांतीलाल चित्ते याच्या पतंग‎ विक्रीच्या दुकानात धाड टाकून ५‎ हजार ५०० रूपयांचा नायलॉन मांजा‎ जप्त केला. तसेच शहादा पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल केला.आझाद‎ नगर परिसरात नकी उर्फ नविद‎ साजिद अन्सारी याच्या विराेधात ४‎ हजार ९०० रूपयांचा मांजा‎ बाळगल्याने गुन्हा दाखल केला.‎

बातम्या आणखी आहेत...