आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबारमध्ये संजय राऊत:वाढदिवशी केक जास्त खाल्ला असेल चंद्रकांत पाटलांना गांभीर्याने घेऊ नका; पिंजऱ्यातला वाघ म्हणता, त्या वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा - राऊत

नंदुरबार3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रकांत पाटलांना गांभीर्याने घेऊ नका -संजय राउत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आपल्या वाढदिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी वाकयुद्ध रंगले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पाटील यांची पुन्हा फिरकी घेतली. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका असे राऊत म्हणाले. ते नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

...मग, पिंजऱ्यात येऊन दाखवा
चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी शिवसेनेला पिंजऱ्यातला वाघ असे म्हटले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, "काल चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांनी केक जास्त खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका. ते पिंजऱ्यातला वाघ म्हणतात. पण, वाघ हा शेवटी वाघच असतो. पिंजऱ्यातला असो की बाहेर. वाघाला पिंजऱ्यात का ठेवले जाते? उघडले की तुमच्यावर हल्ला करणारच ना. ठीक आहे पिंजऱ्याचा दार तुमच्यासाठी उघडा ठेवतो. या आतमध्ये, येऊनच दाखवा." असे ते गंमतीने म्हणाले आहेत.

प्रशांत किशोर शरद पवार भेटीवर म्हणाले...
प्रशांत किशोर हे एक राजकीय स्ट्रॅटेजिस्ट आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पडद्यामागून मदत केली होती. त्यात त्यांना यश देखील मिळाले. अनेक राष्ट्रीय नेते आणि पक्षांचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्या संपर्कात असतात. त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्याचप्रमाणे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे पाहावे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावरून राजकारणात विविध चर्चा उठल्या आहेत. परंतु, मुख्यमंत्र्यांनी राजकीय शिष्टाचार म्हणून ही भेट घेतली आहे. त्यावरून राजकारण करू नये. तसेच मराठा आरक्षण आता राज्य सरकारच्या हातात राहिलेले नाही. मराठा आरक्षणावर केंद्र सरकारनेच भूमिका घ्यावी असेही संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...