आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:संकल्प ग्रुपतर्फे शिबिरात 40 बालकांची तपासणी; नागरिकांचा शिबीरास उत्तम प्रतिसाद

शहादा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरीब आणि गरजूंसाठी कार्य करणाऱ्या संकल्प ग्रुप शहादातर्फे लहान मुलांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवसाच्या बाळापासून ते १५ वर्षांच्या मुलापर्यंत शिबिर साई क्लिनिक येथे आयोजित करण्यात आले होते.

तपासणी शिबिरास स्वरा बाल रुग्णालय शहादाचे संचालक तसेच सुरत येथे पाच वर्षे आपली सेवा बजावलेले डॉ. राहुल पाटील यांनी सेवा दिली. लहान बालकांना व त्यांचा पालकांना याचा लाभ मिळाला. शहादा तालुक्यातील नागरिकांनी आपल्या मुलांना शिबिरास आणावे, असे संकल्प ग्रुपतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत जवळपास ४० बालकांची तपासणी शिबिरांतर्गत करण्यात आली.

शिबिरात लहान बाळांची सर्व प्रकारची तपासणी, अॅलर्जी, बालदमा तपासणी, बाळाचे चिडचिड करणं, बाळाचे वजन वाढवण्याकरिता सल्ला, लसीकरणाबद्दल मार्गदर्शन, वाफ देण्याची सुविधा देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...