आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पर्यावरण दिनानिमित्त धडगाव तालुक्यातील कुंडल येथे रविवार ५ जून रोजी आदिवासी एकता परिषद व कुंडल गाव समितीतर्फे सातपुडा आदिवासी महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. या पंचायतीत ‘निसर्ग व आदिवासी या दोन्ही घटकांमधील नाते’ यासह विविध विषयांवर मंथन करण्यात येणार आहे. आदिवासी जीवन पद्धती व संस्कृतीची नाळ निसर्गाशी जुळते. निसर्गाशिवाय आदिवासी संस्कृतीची फारशी कल्पनाच करता येत नाही. तर निसर्ग वाचवण्याची ताकद केवळ आदिवासी जीवन पद्धतीतच आहे. त्यामुळे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही महापंचायत होत आहे. परक्या संस्कृतीच्या आघाताने आदिवासी संस्कृतीचा ऱ्हास, प्रगत मानवी जीवनमूल्यांना निर्माण झालेला धोका, बऱ्याच वेळा नानाविध नावे ठेवत, हिणवत आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता व स्वाभिमान यावर बोट ठेवण्याची प्रथा, स्थलांतर व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, परक्या जातीत आदिवासी मुला-मुलींचे होणारे लग्न व उद्भवणाऱ्या समस्या, दहेज (हुंडा)ची वाढती रक्कम व निर्माण होणारे धोके या महत्त्वपूर्ण विषयांवरही पंचायतीत चर्चा करण्यात येणार आहे. या महापंचायतीत आदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी, आदिवासी विचारवंत सांगल्याभाई वळवी, व्याराचे माजी खासदार अमरसिंगभाई चौधरी, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, एकता परिषदेचे प्रदेश सचिव डोंगरभाऊ बागुल, डॉ.सुनील पऱ्हाड (पालघर), राजू पांढरा, माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास नटावदकर, जि.प.कल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.चे गटनेते सी.के. पाडवी, सेवानिवृत्त अभियंता जेलसिंग पावरा, करमसिंग पाडवी, ॲड.अभिजित वसावे आदी उपस्थित राहणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.