आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाली संमेलन:व्यवसाय योजनांमध्ये लोणखेड्याच्या सातपुडा विद्यालयास मिळाला प्रथम क्रमांक, नावीन्यपूर्ण शेती उपकरणांत सातारा

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावच्या जैन हिल्स येथे ‘फाली’च्या आठव्या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी पहिल्या सत्रात ६७ शेती व्यवसाय योजना आणि ६७ नावीन्यपूर्ण उपकरणांविषयी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. नाविन्यपूर्ण शेती उपकरणांत सातारा तर व्यवसाय योजनांत नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा येथील सातपुडा विद्यालय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. संमेलनाचे दुसरे सत्र ४ आणि ५ जूनला आयोजित केले आहे. ‘फाली सारख्या संस्थांच्या माध्यमातून भविष्यकालिन शेतीत संशोधनाची दिशा निश्चित होत आहे. फालीच्या संमेलनातून युवा शेतकरी, संशोधक आणि नव उद्योजक समोर येत आहे. अशा घटकांना युपीएलसारखे उद्योग शिष्यवृत्ती व लघुउद्योग निर्मितीसाठी मदत करतील असे प्रतिपादन युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी केले. ‘फाली’मुळे शेतीकडे नवी पिढी वळते आहे. शेतीतील नवसंशोधन सर्वच उद्योगांसाठी पूरक आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा संकल्प सर्वांनी करावा. आपला परिवार शेतीमय करण्याचा प्रयत्न केला तर देशात शेतीची प्रगती होईल असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले..

नावीन्यपूर्ण शेती उपकरणे गट : सॉइल मोइश्चर ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीम : भारतमाता विद्यालय मायनी, सातारा (प्रथम), स्मार्ट इरिगेशन सिस्टीम : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे (द्वितीय), अग्रिकल्चर मल्टिपर्पज इम्पिमेंट : श्रीराम विद्यालय नांदगोमुख नागपूर (तृतीय), मल्टिपल बेनिफीट टूल : रावजी फते विद्यालय खराशी पुणे (चतुर्थ), फर्टिलायझर एप्लिकेटर :म. गांधी विद्यालय कर्जत (पाचवा).

बातम्या आणखी आहेत...