आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करावे आणि आयुष्यात आपल्याला जे काही साध्य करायचे असेल त्यावर लक्ष केंद्रित करून त्यावर काम करावे. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी महत्त्वाचा असून वेळेच नियोजन असावे, असा सल्ला उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी दिला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे होते. या वेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, प्राचार्य डॉ.डी.एम. पटेल होते. कार्यशाळेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव कमल पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हेमंत सूर्यवंशी यांनी केले. प्रा.सय्यद हमीद हसनी यांनी आभार मानले. तसेच वक्त्यांचा परिचय प्रा.अमित धनकानी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.