आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:शिष्यवृत्तीची परीक्षा; 15 डिसेंबरपर्यंत अर्ज मुदत

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यंाना १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. गतवर्षी पाचवीचे २२६ व आठवीचे २२६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यंदा अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी परीक्षा फाॅर्म भरावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फेे डॉ. युनूस पठाण यांनी केले आहे. या संदर्भात नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. नंदुरबार शिक्षण विभागाने सलग तीन वर्षांची आकडेवारी दिल्याने वरिष्ठांनी नंदुरबारच्या अधिकाऱ्यांच्या कामाची स्तुती केली. पाचवीच्या पात्र विद्यार्थ्यांना महिन्याला १००० तर आठवीच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना महिन्याला १५०० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेचा गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात होत असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. २०२१ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीच्या ६ हजार ९१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील २२६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

असे असतील प्रश्न
प्रथम भाषेमध्ये २५ प्रश्न विचारले जातात त्याला प्रत्येकी दोन गुण दिले जातात. गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ५० प्रश्न विचारले जातात. एकूण ७५ गुणांची परीक्षा असते १५० गुण दिले जातात. तृतीय भाषा २५ प्रश्न व बुद्धिमत्ता चाचणी ५० प्रश्न विचारले जातात.

बातम्या आणखी आहेत...