आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज, पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके; गणवेशाबाबत अडचणी

नंदुरबार18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या बुधवारपासून शाळा सुरू होणार असून पहिल्या दिवशी शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. गणवेशचा निधी तांत्रिक अडचणींमुळे बँक खात्यावर गेला नसल्याने दोन दिवसांत निधीही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यावर जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या निधीतून कपड्यांची खरेदी, त्यानंतर शिवणे, यावर दोन महिने लागू शकतात. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत गणवेशाबाबत सूट देण्यात आली आहे. सहा तालुक्यांपैकी पाच तालुक्यात शंभर टक्के पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचली असून धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील २५ शाळांपर्यंत ९ हजार ७५२ पाठ्य पुस्तके पोहाेचवण्याचे बाकी आहेत.

कोरोनाकाळात दोन वर्ष शालेय जीवन विस्कळीत झाले होते. आता १५ जूनपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत. १३ व १४ जून रोजी शाळेच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक कामाला लागले. पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहाची स्वच्छता यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ११ लाख ८६ हजार ४८३ पुस्तकांची मागणी होती. प्रत्यक्षात ११ लाख ७६ हजार ७३१ पुस्तकांचे वितरण शाळास्तरावर करण्यात आले आहे. १ हजार ८९८ शाळांना मोफत पुस्तकांचा लाभ देण्यात आला आहे. त्यापैकी १ हजार ८७३ शाळांपर्यंत पुस्तके पोहोचवण्यात आली आहेत.

मुलांना प्रवेश देण्यासाठी यंदा गृहभेटीवर आहे भर
दोन दिवस पूर्णपणे शाळेचा आवार स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या आहेत. वर्गखोल्यांची सफाई तसेच स्वच्छतागृहे सफाई तसेच पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या. मुलांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागातर्फे गृहभेटीवर भर देण्यात येणार आहे. तसेच मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सतीश चौधरी, शिक्षणाधिकारी, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...