आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुमान पटकावला:नटावदकर च्या क्रिकेट संघाची विभागावर निवड

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्ष वयोगटातील क्रिकेट संघाने राज्य शासनाच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत नवापूरच्या संघाचा अंतिम सामन्यात पराभव करुन विभाग स्तरावर नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान पटकावला.

या विजयी संघात कर्णधार सौरव देवरे, उपकर्णधार पीयूष वळवी यांच्यासह जयेश कोळी, चिंतन बयानी, हिमांशू राजपूत, रोहित कोकणी, गौरव माळी, चिराग वसावे, नयन शिंदे, निखिल मोहिते, मोहित मोरे, कुशल चव्हाण, दुर्गेश गावित, रामचंद्र चव्हाण, हिमांशू नन्नवरे, यश वळवी यांचा समावेश आहे. अंतिम सामन्यांत सामनावीर म्हणून जयेश कोळी तर संपूर्ण मालिकेत हिमांशू राजपूत, चिराग वसावे व सौरव देवरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या संघाचे प्रशिक्षक राजेश वळवी तर संघ व्यवस्थापक राहुल साळुंके, तन्मय शाह व धीरज वसावे होते. विजेत्या संघाचे पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, एकलव्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, राष्ट्रीय खेळाडू जयदीप नटावदकर तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. दरम्यान या खेळाडूंमुळे अन्य विद्यार्थ्यांनाही खेळाची गाेडी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त हाेते.

बातम्या आणखी आहेत...