आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची संधी:शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांतर्फे निवड

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील २०२१-२२ या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतींद्वारे चांगले वार्षिक पॅकेज देऊन निवड झाली आहे. निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे समन्वयक तथा प्राचार्य मकरंद पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.आर.एस. पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक प्राचार्य पाटील, कुलसचिव दिनेश पाटील व महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...