आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर घेतला शेल्फी; जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत परिचारिका दिनाचा कार्यक्रम

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्रात जागतिक परिचारिका दिनानिमित्त गेल्या दोन वर्षात उत्तीर्ण झालेल्या एएनएम आणि जीएनएम मधील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी तसेच उत्कृष्ट परिचारिका यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर परिचारिका दिन मोठ्या संख्येने एकत्रित साजरा करता आल्याने मनसोक्तपणे उत्साहात सेल्फीचा आनंद जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह आधुनिक परिचारिकेचे जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य जितेंद्र चव्हाण यांनी जागतिक परिचर्या दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के.डी. सातपुते होते. त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून आधीसेविका शैलजा मोरे, परिचारिका सुषमा गावित, नम्रता मदने, निकिता चव्हाण, आकाश केंद्रे, सुशील केदार, ममता ठाकरे, सोनल कोडोलीकर, संतोष मुठे उपस्थित होते. नंदुरबार परिचर्या प्रशिक्षण केंद्रातून सन २०१९ -२० आणि २०२१ या कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या तसेच उत्कृष्ट कार्य असलेल्या परिचारिका यांना गौरवण्यात आले. कोविडनंतर दोन वर्षाच्या कालावधीने साजरा झालेल्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्वांच्या चेहऱ्यावर चैतन्य व हास्य उमलले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाची काजल चव्हाण व प्रीती पानपाटील यांनी केले. आभार सुशील केदार यांनी मानले. परिचारिका सप्ताहाचे सुयोग्य नियोजन प्राचार्य जितेंद्र चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रथम व द्वितीय वर्षातील परिचर्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...