आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील लक्कडकोट येथील मारहाण प्रकरणी येथील न्यायालयाने एकास दोषी ठरवून त्यास दोन वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. लक्कडकोट येथील जगदीश मूलचंद गोले हा त्याच्या घरी असताना मोहन दुलीचंद गोले हा तेथे आला. त्याने तेथे पडलेल्या विटा साफ करण्याच्या कोयत्याने जगदीश गोरे यांच्या डोक्यावर व डाव्या हाताच्या पंजावर मारले. त्यामुळे त्यांच्या हाताचा पंजा फ्रॅक्चर झाला. त्याबाबत त्यांनी म्हसावद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास करून तपास अधिकाऱ्यांनी आरोपी मोहन गोले याच्याविरुद्ध शहादा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सात महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्षी पुरावा म्हणून नोंदवण्यात आल्या.
साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी पुराव्यातून आरोपी माेहन गाेले याने फिर्यादी जगदीश गाेले यास विटा साफ करण्याच्या कोयत्याने डोक्यावर व डाव्या हाताच्या पंजावर मारून हाताचा पंजा फ्रॅक्चर केल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा न्यायालयासमोर आला. शहादा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्या.जी.बी. जानकर यांनी आरोपी मोहन गोले यास भादंवि कलम ३२६ प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्यामुळे दोन वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
अन्यथा पुन्हा कैद
गाेले यांना दाेन वर्षांची शिक्षा व २ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. दंड न भरल्यास ३० दिवस साध्या कायद्याची तरतूदही निकालात केली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून राहुल बिराडे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.