आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत. अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेने सोबतच राहू. आम्हाला पदाची लालसा नाही. शिवसेना आमचा प्राण आहे. पक्ष संकटात असताना सोडून जाणे ही पक्षासोबत गद्दारी असून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गद्दारी करणे शिकवले नसून, स्वाभिमानाने ताठ मनाने जगणे शिकवले आहे, असे आश्वासन आमदार आमश्या पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी आमदार पाडवी व जिल्हा सह संपर्कप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. या वेळी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आम्ही पक्षाशी गद्दारी करणार नाही अखेरच्या श्वासापर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करून शिवसेनेशी एकनिष्ठ राहू अशा आशयाचे अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील ५ हजार तर शहादा विधानसभा क्षेत्रातील अडीच हजार असे सुमारे साडेसात हजार शपथपत्र शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भेट स्वरूपात दिले. या वेळी त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. आमदार आमश्या पाडवी यांच्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेला भक्कम बळ देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. या संकटसमयी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिक माझ्यावर विश्वास व्यक्त करून पक्षाशी एकनिष्ठ आहेत ही गौरवास्पद बाब आहे. येत्या काळात मी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करणार असून, प्रत्यक्ष नागरिक व शिवसैनिकांशी भेटी घेऊन संवाद साधणार आहे, असे त्यांनी सांगितले.
खरे शिवसैनिक आजही शिवसेनेशी एकनिष्ठच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेस तर जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे हे राष्ट्रवादीसोडून शिवसेनेमध्ये आले होते. हे दोघेही त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना सोडून गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील खरे शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेची एकनिष्ठ आहेत. भविष्यातही एकनिष्ठ राहणार आहे. अरुण चौधरी, नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.