आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात शहादा तालुक्याचा सर्वाधिक तर तळोदा तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला. अक्कलकुवा तालुक्यात २ हजार ५२६ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी २ हजार ३७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १ हजार १८७ विद्यार्थी व १ हजार १८९ विद्यार्थींनींचा समावेश आहे. अक्कलकुवा तालुक्याचा ९४.०६ टक्के निकाल लागला. धडगाव तालुक्यात १ हजार ३४२ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी १ हजार २७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ५९७ विद्यार्थी व ६७५ विद्यार्थींनींचा समावेश आहे.
धडगाव तालुक्याचा ९४.७८ टक्के निकाल लागला. नंदुरबार तालुक्यात ५ हजार ७१० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५ हजार ४४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २ हजार ९३४ विद्यार्थी तर २ हजार ५११ विद्यार्थींनीचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्याचा ९५.३५ टक्के निकाल लागला. नवापूर तालुक्यात ३ हजार ५७२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी ३ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यात १ हजार ७१० विद्यार्थी व १ हजार ६२२ विद्यार्थींनींचा समावेश आहे. नवापूर तालुक्याचा निकाल ९५.१५ टक्के लागला. तळोदा तालुक्यात १ हजार ८३४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ हजार ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८६६ विद्यार्थी व ८०० विद्यार्थिनींचा समावेश आहे. तळोदा तालुक्याचा निकाल ९०.८३ टक्के लागला. ३४६ पुनर्परीक्षार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर तृतीय श्रेणीत १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा ९२.५३ टक्के निकाल
बोरद | येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा निकाल ९२.५३% टक्के लागला. ६७ पैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल. प्रथम योगेश महेश कोळी (८८ टक्क), द्वितीय राहुल भिका पिंपळे ( ८७.८%), तर तृतीय क्रमांक मानसी छोटू वरसाळे या विद्यार्थिनीने मिळवला असून तिला ८७.०२% गुण मिळाले आहेत. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी, प्राचार्य एन. जे. सूर्यवंशी, पर्यवेक्षक बी. ए. पवार यांनी कौतुक केले.
रिंकू राठोडला ९०.६० टक्के गुण, शारदा कन्या विद्यालयात प्रथम
शहादा | येथील शारदा कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी रिंकू राधूसिंग राठोड दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. शाळेच्या एकूण निकाल ९४.९५ टक्के लाभला आहे. रिंकू हिचे सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती वर्षा जाधव तसेच संस्थेचे समन्वयक संजय राजपूत मुख्याध्यापिका श्रीमती एस.झेड.सैय्यद पर्यवेक्षक एन.बी.कोते यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.