आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शहादा कलाल समाज अध्यक्षपदी प्रा. गणेश सोनवणे यांची तिसऱ्यांदा झाली फेरनिवड

शहादा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कलाल समाजाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा प्रा. गणेश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. येथील माळसादेवी मंदिराच्या आवारात कलाल समाजाची वार्षिक बैठक झाली. अध्यक्षस्थानी डॉ. विजय कलाल होते. बैठकीत समाजाेपयोगी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन नूतन कार्यकारिणी सर्वांमध्ये जाहीर करण्यात आली.

प्रा. गणेश सोनवणे अध्यक्ष, डॉ. विजय आनंदराव कलाल उपाध्यक्ष, सचिव प्रा. विलास जावरे, कोषाध्यक्ष राकेश कलाल, प्रसिद्धीप्रमुख वसंत कलाल, नीलेश कलाल, कृष्णा काळकर सहसचिव तर सल्लागार म्हणून डॉ. विष्णुसा कानडे, रमाकांत कलाल, हरिसा कलाल, विजय नारायण कलाल यांचा समावेश आहे. बैठकीत डॉ. विजय कलाल, प्रा. विलास जावरे, डॉ. विष्णुसा कानडे, गिरीश जावरे, प्रकाश कलाल, वसंत कलाल, गोपाळ कलाल यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...