आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुक:शहादा शिवजयंती समितीचा‎ पोलिस प्रशासनाकडून गौरव‎

शहादा‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष‎ राजेंद्र भटू अग्रवाल यांना नंदुरबार जिल्हा‎ पोलिस प्रशासनातर्फे ८ मार्च रोजी जिल्हा‎ पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते‎ प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.‎ यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस‎ अधीक्षकांसह विविध पोलिस अधिकारी‎ तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.‎ प्रशस्तीपत्र स्वीकारताना राजेंद्र अग्रवाल‎ यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते कार्तिक नाईक,‎ सागर मराठे, प्रशांत कदम, देवेंद्र पानपाटील‎ उपस्थित होते. शिवजयंतीच्या मिरवणुकीला‎ कोणत्याही प्रकारचे डीजे व डॉल्बी वाद्य न‎ वाजता पारंपारिक वाद्य वाजवण्यात आले‎ शिवाय शहादा शहरात काढण्यात आलेल्या‎ शिवजयंतीच्या मिरवणुकीत विविध देखावे,‎ ऐतिहासिक सांस्कृतिक दर्शन, शिस्तबद्ध अशी‎ मिरवणूक काढण्यात आल्याने शहादा‎ शिवजयंती उत्सव समितीचा नंदुरबार येथे‎ झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.‎

शहर शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पदाधिकारी व सदस्यांचे माजी जि.प. सभापती‎ अभिजित पाटील, पालिकेचे माजी गटनेते‎ मकरंद पाटील, जिल्हा शिवसेना‎ सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, रिपाइंचे‎ जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, अॅड.सरजू‎ चव्हाण, चतुर्भुज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते‎ अनिल भामरे, शिवाजी मोतीराम पाटील,‎ बजरंग दलाचे राजा साळी यांनी कौतुक केले.‎ या गाैरवामुळे अाणखी प्रेरणा मिळाली असून‎ इतरही अनुकरण करतील, असा विश्वास‎ व्यक्त करण्यात अाला.‎

बातम्या आणखी आहेत...