आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:शहादा मंदिर चोरी 24 तासांत उघड; दाेेघे जेरबंद

नंदुरबार/शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा शहरातील दादावाडी ट्रस्टचे श्री.सुघोषाघंट मंदिरातील ७ दान पेट्या उचलून १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम चोरी प्रकरणी दोघांना मध्य प्रदेशमध्ये जाऊन अटक करण्यात एलसीबीच्या पथकास यश आले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहादा शहरातील घंटा मंदिर येथे झालेल्या चाेरीमागे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सनावद येथील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तत्काळ पथक तयार करून सनावदला रवाना केले. सुलतान शेख व सूरज ठाकूर यांचे राहण्याचे निश्चित ठिकाण शोधून काढण्यात यश आले.

पथकाने संशयितांच्या घराच्या आजूबाजूला वेषांतर करुन सापळा रचला. २१ डिसेंबरला पहाटे ४ वाजेच्या सुमारास संशयितांच्या घरात प्रवेश करताना दोन संशयित इसम दिसले. पथकाने अत्यंत सावधगिरीने दोन्ही आरोपींवर झडप घालून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. सुलतान शेख रशीद शेख (वय १९) ह.मु.सनावद, जि. खरगोन व सूरज नवलसिंग ठाकूर (वय २०), चालक, मूळ रा.अकोला, ह.मु.सनावद असे सांगितले.

मंदिराच्या दानपेटीमधून चोरी केलेले पैसे त्यांच्याजवळील बॅगेत असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने सुलतान शेखच्या बॅगेतून ४१ हजार ३१० रुपये तर सूरज ठाकूर याच्या बॅगेतून ३९ हजार ८०० रुपये असा एकूण ८१ हजार ३१० रूपये रोख मिळून आल्याने ते गुन्ह्यात जप्त केले. राज्यातील इतर जिल्ह्यांत वेगवेगळ्या मंदिरातून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही संशयित आरोपींकडून दाेन्ही राज्यातील एकूण १२ गुन्हे उघडकीस आल्याने त्यांना मुद्देमालासह गुन्ह्याचे पुढील तपासासाठी शहादा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पथकास राेख दहा हजारांचे बक्षीस जाहीर
एलसीबीच्या पथकाने मंदिरातील चोरीसारखा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघडकीस आणल्याने नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील व एलसीबीचे अभिनंदन, कौतुक केले. जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी पथकास त्याबद्दल १० हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...