आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतकरी प्रोत्साहन अनुदान वाटपात शहादा अव्वल; महा डीबीटीमुळे शेतकऱ्यांना लाभ; आतापर्यंत 8 कोटी रुपये प्रोत्साहनपर निधी वाटप

शहादाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याची योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने एकच अर्ज केल्यानंतर सोडत पद्धतीने वेगवेगळे शेतकऱ्यांना त्याच्या अनुदानाचा लाभ प्रोत्साहनपर स्वरूपात मिळत असतो. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आतापर्यंत ८ कोटी रुपये प्रोत्साहनपर निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केल्याने जिल्ह्यात तालुका अव्वल ठरला आहे.

सन २०२०-२१मध्ये ३६७ शेतकऱ्यांना लाभ दिला आहे.यात ५६ लाभार्थी कृषी यांत्रिकीकरणाचा ४२ लाख ७४ हजार लाभ घेतला आहे. ३०१ लाभार्थी यांनी ठिबक सिंचन व सिंचन सुविधा या योजनेंतर्गत १ कोटो ९७ लाख तसेच फलत्पादन योजनेंतर्गत १० लाभार्थींना १६ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

या योजनेसाठी शेतकरी यानी २३ रूपये ६० पैसे चलन भरून अर्ज करू शकतात तसेच शेतकरी याची सोडत पध्दतीने निवड करण्यात येत. एकदा अर्ज भरला की कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही. कांदाचाळ, शेडनेट, संरक्षित शेती, शेततळे अस्तरीकरण, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले असून ठिबक सिंचन अनुदान वाटपामध्ये शहादा तालुका अव्वल आहे.