आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामकरण‎:मराठा पाटील समाज मंगल कार्यालयाचे‎ शाहीर हरिभाऊ मराठा पाटील नामकरण‎

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ज्ञानदीप सोसायटीमध्ये बनवण्यात‎ आलेल्या मराठा पाटील समाज मंडळाचे शाहीर‎ हरिभाऊ मराठा पाटील नूतन मंगल कार्यालयाचे‎ नामकरण व उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी‎ यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी मंडळाचे‎ अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य बी. एस. पाटील होते. माजी‎ नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उद्योगपती डॉ. रवींद्र चौधरी,‎ देणगीदार उषाबाई हरिभाऊ पाटील, सेवानिवृत्त जिल्हा‎ शल्य चिकित्सक डॉ. जी. एन. मराठे, हृदयरोग तज्ज्ञ‎ डॉ. दीपक अंधारे, सचिव यशवंत पाटील, जिल्हा‎ शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, विश्वास पाटील,‎ शालिग्राम पाटील, धुळे भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष‎ दिनकर पाटील, भास्कर पाटील, युवराज पाटील,‎ माजी नगरसेवक कैलास पाटील, गो. पी. लांडगे, प्रा.‎ व्ही. एम. अहिरराव, प्रा. आर. बी. पाटील, मधुकर‎ पाटील, आर. डी. मोरे, निंबाजीराव बागुल, राजेंद्र‎ बागुल उपस्थित होते. प्रास्ताविक यशवंत पाटील यांनी‎ केले. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर व प्रा. डॉ.‎ माधव कदम यांनी केले. उमेश भदाणे यांनी आभार‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...