आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर, लवकरच कोसळणार; अॅड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याचे शिंदे-फडवणीस सरकार हे बेकायदेशीरपणे सुरू आहे. राज्यपालांपासून तर सर्वच पक्षाचे राजकीय नेते बेतालपणे बोलत आहेत. कायद्याच्या दृष्टीने निकाल लागला तर हे सरकार लवकरच कोसळेल. तसेच राष्ट्रपती राजवट लागून मध्यावधी निवडणुका लागतील. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना नव्याने पक्षाची बांधणी करावी लागेल. एकनाथ शिंदेंसह अनेक नेत्यांना नव्याने उभे राहताना अडचणी येतील. शासनाने बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार, खासदार, मंत्र्यांना पाच वर्षांसाठी आचारसंहितेसोबतच विचार संहिता लागू करावी, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वकील अॅड. असीम सरोदे यांनी केले.

नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, प्रा. पुष्पेंद्र रघुवंशी, डॉ. एस.एस. हासाणी, अॅड. श्रीया आवले आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, विक्रांत दोरकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यातही राजकीय भाष्य केले.

बातम्या आणखी आहेत...