आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्री:शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आज मिलसह दत्त मंदिर परिसरात दाैड

धुळे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहरात नवरात्रीनिमित्त श्री दुर्गामाता दाैड काढली जाते. त्यानुसार उद्या गुरूवारी (दि.२९) राेजी सकाळी ६ वाजता देवपूर विभागाची दुर्गा दाैड दत्तमंदिर परिसरात काढण्यात येणार आहे. तर शहर विभाागाची दुर्गामाता दाैड मिल परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून काढली जाईल. ती धनाई,पुनाई काॅलनी, सिताराम माळी चाळ, एकता नगर, श्रीराम मंदिर, दिपलक्ष्मी काॅलनी, केदार सिटी, सहजीवन नगर, समता नगर,स्वराज्य जीम, साईदर्शन काॅलनी, रासकर नगर, अहिल्यादेवी नगर आदी भागातून काढण्यात येवून स्वामी समर्थ केंद्रात समाराेप केला जाणार आहे.