आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपहासात्मक आंदोलन:इंधन दरवाढ, वाढत्या महागाईच्या निषेधासह केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांचा केला विरोध, अक्कलकुव्यात शिवसेनेने केले मिठाईचे वाटप

अक्कलकुवा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना, युवासेना, युवती सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

नंदुरबार ब्युरो | पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडर यांची होणारी दरवाढ व त्यामुळे वाढणारी महागाई यांच्या निषेधार्थ शिवसेना, युवासेना व युवती सेना यांच्याकडून रविवारी तालुक्यांच्या ठिकाणी उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. अक्कलकुवा येथे मिठाई वाटप करून तर धडगावला थाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध केला.

केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेनेच्या वतीने मिठाईचे वाटप करून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली. ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राज्यभरात एकाच वेळी केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व इतर जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ आणि महागाईच्या विरोधात थाळी वाजवून व मिठाई वाटप करून केंद्रातील भाजप सरकार विरोधात आभार मानण्यासाठी उपहासात्मक आंदोलनाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रविवारी अक्कलकुवा येथे दाजिबा पेट्रोल पंपावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली मिठाई वाटून हे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली व जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, जि.प. सदस्य किरसिंग वसावे, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, जिल्हा उपसंघटक मधुकर मिस्तरी, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी, उपतालुका प्रमुख तुकाराम वळवी, ग्रा.पं. सदस्य जगदीश चित्रकथी, छोटू हाश्मी, पृथ्वीसिंग पाडवी, सिंधू वसावे, सरला वळवी, संगीता पंजराळे, रवींद्र चौधरी, जसराज पवार, किरण भावसार, जी.डी. पाडवी, ईश्वर तडवी, प्रकाश खींची, आश्विन सोनार, पार्थ लोहार, जमील बलोच, हाफिज मक्राणी, गोलू चंदेल आदींसह शिवसेना, युवासेना व युवती सेना, विद्यार्थी सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना तसेच शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या यशस्वितेसाठी जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शहरप्रमुख रवी चंदेल आदींनी परिश्रम घेतले.

केंद्राच्या अन्याय्य धोरणाचाही जाहीर निषेध
आंदोलनावेळी उपस्थितांना युवा सेना जिल्हाप्रमुख ललित जाट यांनी या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली. तसेच सर्वसामान्य जनतेला महागाईच्या आगीत होरपळू देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.

धडगावला युवा सैनिकांकडून थाळ्या वाजवून आंदोलन
धडगाव

केंद्र सरकारतर्फे होणाऱ्या इंधन दरवाढीच्या व वाढत्या महागाई विरोधात नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव शहरातील भगवा चौकात थाळी वाजवून व मिठाई वाटप करून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेना पदाधिकाऱ्यांनी ‘बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’, ‘आज का युवा है बेरोजगार, अब की बार मोदी सरकार’ अशा उपरोधिक घोषणा देत, थाळी वाजवून व मिठाई वाटून हे आंदोलन झाले.

यावेळी युवासेनेचे योगेश पाटील, तालुकाप्रमुख महेश पाडवी, उपनगराध्यक्ष राजू पावरा, उपशहरप्रमुख अनिल खैरनार, युवासेना शहरप्रमुख बंटी सोनवणे, नगरसेवक रघू पावरा, हर्षिल चव्हाण, नारायण पावरा, दिलवरसिंग पावरा, सुनील मोरे, उपशहरप्रमुख रणजित चव्हाण, रिझवान बेलदार, मिनेश पाडवी, लीलाबाई ठाकूर, गुलाबसिंग गार्दी, सायसिंग वळवी, किसन पावरा, महेंद्र मेटकर, विजय चव्हाण, भिका पाडवी, हर्षल खैरनार, रवी चव्हाण, गोपाळ पावरा, रेल्या पावरा, मनोज पावरा, बाळू मिस्त्री, राहुल चव्हाण, मयूर पाटील, मकबूल तेली, शिवा चव्हाण, बबलू पठाण, सुनील चव्हाण, वीरसिंग पावरा व शिवसैनिक, युवा सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. गॅस व इंधन दरवाढीमुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्यांनी संसाराचा गाडा कसा हाकावा, असा सवाल लीलाबाई ठाकूर यांनी केंद्र सरकारला केला.

बातम्या आणखी आहेत...