आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपत प्रवेश:शिवसेना जिल्हाप्रमुख मोरेंचा भाजपत प्रवेश ; फडणवीस यांच्या उपस्थिती

नंदुरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी शनिवारी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या खासदार डॉ.हीना गावित, आमदार विजयकुमार गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

विक्रांत मोरे यांनी यापूर्वीच शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला नव्हता. गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या अनेक मेळावे, कार्यक्रमात ते अनुपस्थित होते. पक्षनेत्यांशी मतभेद वाढत जाऊन अखेर त्यांनी शिवसेेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून शनिवारी भाजपत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख पद सोडून ते भाजपत गेल्याने त्यांना त्या पक्षात कुठले स्थान मिळते, याकडे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...