आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:शिवसेना जिल्हा संघटकपदी पंकज चाैधरी‎

नंदुरबार‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‎ आदेशानुसार आणि शिवसेना संपर्कप्रमुख‎ व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या‎ मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या नंदुरबार‎ जिल्हा संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते‎ पंकज चौधरी यांची निवड झाली.‎ त्याबद्दल येथील मंगळ बाजार व्यापारी‎ असोसिएशनतर्फे कन्यादान मंगल‎ कार्यालयाचे संचालक संदीप चौधरी‎ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.‎

मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे‎ संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रास्ताविक केले. या सत्कारप्रसंगी‎ कार्यक्रमास मंगळ बाजार व्यापारी‎ असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संजय‎ भदाणे, कार्याध्यक्ष किरण चौधरी,‎ उद्योजक जगदीश शितपाल, जेठमल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अंबानी, सुरेश मंगा चौधरी, दगा चौधरी,‎ सुनील चौधरी, प्रेमचंद राजपूत, नरताप‎ गोसावी, भूषण ईशी, चंदू गोसावी, गणेश‎ जावरे, किरण भोई, संतोष देवळालीकर व‎ परिसरातील व्यापारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...