आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्चस्व:शनिमांडळ विकासोवर चुरशीच्या लढतीत शिवसेनेने राखले वर्चस्व ; सहकार भाजपच्या परिवर्तन पॅनलचा झाला दारुण पराभव

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिमांडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला असून, प्रतिस्पर्धी भाजपच्या परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. शनिमांडळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनल व आ.डॉ. विजयकुमार गावित पुरस्कृत परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत रंगली होती. गेल्या १५ दिवसांपासून प्रचारावर भर देण्यात येत होता. प्रचारात शेतकरी विकास पॅनल वरचढ ठरला. माजी आमगार रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करीत विजयश्री प्राप्त केली. सर्वसाधारण खातेदार कर्जदार मतदारसंघ दिलीप घुगे, नामदेव पाटील, भाऊराव पाटील, संतोष पाटील, हिंमत पाटील, हिरामण माळी, ठाणसिंग राजपूत, सरदारसिंग राजपूत, इतर मागासवर्गीय प्रवर्ग (राखीव) शिवाजी पाटील, महिलांसाठी (राखीव) मतदारसंघ उषाबाई पाटील, हिराबाई पाटील, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग कृष्णा धनगर, अनुसूचित जाती जमाती सुरेश ठाकरे विजयी झाले.

आमदार कार्यालयात सत्कार : विजयी उमेदवारांचा आमदार कार्यालयावर सत्कार केला. याप्रसंगी माजी आमदार रघुवंशी, माजी जि.प. सदस्य डॉ. सयाजीराव मोरे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे, पॅनलप्रमुख मुन्ना पाटील, कृउबास माजी सभापती किशोर पाटील, मधुकर पाटील, प्राचार्य सी.पी. सावंत, योगेश मोरे, संतोष धनगर, दगा धनगर, सुनील गिरासे, राकेश राजपूत, कृष्णा राजपूत, जगन पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...