आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:खा.राऊत यांच्या अटकेचा शिवसेनेकडून तीव्र निषेध

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने हेतुपुरस्सर अटक केली असून देशात चौकशीच्या नावाखाली लोकशाहीचा खून हाेत आहे, अशा शब्दांत खासदार राऊत यांच्या अटकेचा नंदुरबार जिल्हा शिवसेनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. तसे निवेदन नंदुरबार प्रमुख राजधर माळी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिले.

शिवसेना नेते खासदार राऊत हे एकमेव नेते भाजपला पुरुन उरत आहेत. सद्य:स्थितीत देशात भाजपच्या विरोधात जो कोणताही पक्ष बोलेल किंवा त्यांच्यातला नेता म्हणून त्यास कोणत्याही खोट्या प्रकरणात ईडीमार्फत चौकशी करुन जेलमध्ये टाकायचे किंवा घाबरवून भाजपमध्ये प्रवेश कर असे धमकावण्याचे घाणेरडे प्रकार केंद्र सरकारमध्ये बसलेले दोन बडे नेते करत आहेत. खासदार राऊत यांना याआधी अनेक धमक्या दिल्या गेल्या; परंतु ते शिवसेना सोडायला व भाजपत जायलाही तयार नव्हते. त्यामुळे त्यांना चौकशीच्या नावाखाली अटक करण्यात आली. याचा निषेध म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार आमश्या पाडवी यांचे आदेशान्वये शिवसेना महानगर व शहरतर्फे निषेधाचे निवेदन देण्यात आले. त्यावर शहर प्रमुख राजधर माळी, महानगर प्रमुख पंडित माळी, भक्तवत्सल सोनार, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, उपजिल्हा अधिकारी सागर पाटील, दादू कोळी, दिनेश भोपे, सुरेखा वाघ, आनंद पाटील, मोन्टी भाबड आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...